‘मन की बात’:भारताचा आत्मा राजकारण नाही तर समाजनीती, समाजशक्ती आहे-मोदी

0

नवी दिल्ली-भारताचा आत्मा राजकारण नाही तर समाजनीती आणि समाजशक्ती आहे, हे १३० कोटी भारतीयाच्या मनातील बात आहे आहे असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘मन की बात’ या कार्यक्रमात सांगितले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासाठी आजचा ‘मन की बात’ कार्यक्रम अतिशय महत्त्वाचा आहे. २०१४ साली सुरू झालेल्या ‘मन की बात’ या कार्यक्रमाचा आज ५० वा भाग आहे.

‘मन की बात’ सरकारी बात नाही, ही सर्व समाजाची बात आहे. ‘मन की बात’ महत्वाकांक्षी भारताची बात आहे असेही यावेळी मोदींनी सांगितले.

पंतप्रधान झाल्यापासून नरेंद्र मोदी हे प्रत्येक महिन्याच्या शेवटच्या रविवारी ‘मन की बात’ या कार्यक्रमातून जनतेशी संवाद साधतात. मोदी ‘मन की बात’मधून फक्त आपले मत व्यक्त करत नाहीत, तर लोकांनी पाठवलेल्या सूचना आणि त्यांचे विचार ऐकून घेतात. या सूचना आणि विचारांनासुद्धा या कार्यक्रमात सहभागी करुन घेतले जाते.

रेडिओ संवादाची तुलना कोणत्याही माध्यमाशी करता येणार नाही. रेडिओशी प्रत्येकजण जोडला गेला आहे; मला रेडिओच्या ताकदीचा अंदाज होता असे पंतप्रधान मोदी म्हणाले.