कलकत्ता-पश्चिम बंगालमध्ये भाजपला रथयात्रा घेण्यास नकार देण्यात आले होते. मात्र कलकत्ता उच्च न्यायालयाने हा निर्णय बदलला असून भाजपला रथयात्रा घेण्यास परवानगी दिली आहे. कलकत्ता न्यायालयाच्या एका बेंचने भाजपच्या रथयात्रेला नामंजुरी दिली होती.
भाजप पश्चिम बंगालमध्ये रथयात्रा काढणार आहे. त्यासाठी परवानगी मागण्यात आली होती, मात्र ही परवानगी नाकारण्यात आली होती. यारून भाजपने ममता बनर्जी यांच्यावर टीका देखील केली आहे. ममता बनर्जी यांचे सरकार लोकशाही विरोधी असल्याची टीका भाजपने केली होती. मात्र आता भाजपला दिलासा मिळाला असून आगामी काळात रथयात्रा घेतली जाणार आहे.