मयताच्या वारसाला नोकरीसह 50 लाखांची भरपाई द्यावी

0

भुसावळ : नगरपालिकेच्या आस्थापना विभागातील कर्मचारी व कोरोना संशयीत रुग्ण विजयसिंग शंकरसिंग राजपूत यांचा 26 जुलै रोजी मृत्यू झाल्याने त्यांच्या वारसाला तत्काळ नोकरीवर घ्यावे तसेच कुटुंबाला 50 लाखांची भरपाई द्यावी, अशी मागणी भुसावळ नगरपालिका प्रशासनाकडे नगरसेवक पिंटू ठाकूर यांनी सोमवारी केली. पालिकेच्या पथकात राजपूत हे कार्यरत असताना त्यांना कोरोनाची लागण झाल्याचा संशय असून या दरम्यान त्यांचा मृत्यू ओढवल्याने असून शासन निर्णयानुसार विम्याची 50 लाखांची रक्कम त्यांच्या वारसास मिळण्याची मागणी करण्यात आली.