जळगाव । मुख्य शाखेचे बचत खातेदार स्व.गजानन सुरेश मराठे यांचा 23 एप्रिल 2017 रोजी बस अपघातात दुर्देवी मृत्यु झाला. सदर व्यक्तीचे जळगाव पीपल्स बँकेमध्ये बचत खाते असल्याचे मुख्य शाखा व्यवस्थापक राजेंद्र सोनार व मिनल नारखेडे यांना ज्ञात होते. त्यानुसार त्यांनी सदर व्यक्तीच्या खात्याची माहिती घेतली असता सदर व्यक्ती जळगाव पीपल्स बँकेने दिलेले रुपे एटीएम कम डेबिट कार्ड ही सुविधा घेतली असल्याचे निदर्शनास आले. न्यु इंडिया इन्शुरन्स लि. यांच्या मार्फत सर्व रुपे एटीएम कार्डधारकांचा 1 लाखाचा अपघाती विमा देत असल्याचे शाखा व्यवस्थापक व बँकेचे अधिकारी दिपक खडसे यांना माहिती दिल्यानंतर वारसदाराने सर्व कागदपत्रे जमा करुन न्यु इंडिया इन्शुरन्स लि.चे डिव्हीजनल मॅनेजर बी.टी. हिवाळे व सिनिअर ब्रँच मॅनेजर संदेश कमलाकर यांनी अधिकार्यांनी याची तत्पर दखल घेऊन त्यांच्या मुंबई ऑफीस सोबत संपर्क करुन सदर विम्याची रक्कम तत्काळ वारसाच्या नावावर मिळणेबाबत कार्यवाही केली.
खातेदारांनी अपघाती विमा संरक्षणाचा लाभ घेण्याचे आवाहन
19 जुलै 2017 रोजी सदर योजनेनुसार रु.1 लाखाची रक्कम वारसाच्या खात्यास जमा करण्यात आली. स्व.गजानन मराठे यांना एकावर्षासाठी रु. 330 मात्र मध्ये रु. 2 लाखाचा प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा योजना व 12 मध्ये 2 लाखाचा प्रधानमंत्री सुरक्षा विमा या योजनांची माहिती देण्यात आली होती आणि त्याअन्वये त्यांचे खात्यास नोंदणी करुन घेतलेली होती. त्यामुळे सदर विम्यांची रक्कम एकुण रक्कम 4 लाख मिळणेबाबतची कार्यवाही देखील बँकेने केलेली असून सदर रक्कमही त्यांचे वारसास लवकरच मिळणार आहे. सदर विमा रकमेचा प्रातिनिधीक चेक स्व.गजानन सुरेश मराठे यांचे वारसदार त्यांचे वडील सुरेश मराठे यांना बँकेतर्फे देण्यात आला. एटीएम रुपे कार्ड वापराच्या माध्यमातून देण्यात आलेली सदर विम्याची मदत ही जिल्ह्यातील पहिलीच घटना होय. बँकेच्या बचत खातेदारास रुपे एटीएम कम डेबिट कार्ड सुविधे अंतर्गत रुपे कार्डधारकास 1 लाखाचा – अपघाती विमा संरक्षण आहे. सदर योजनेनुसार कार्ड धारकाकडून अपघात होण्याआधी 45 दिवसात कमीत कमी एक व्यवहार कार्ड व्दारे केलेला असल्यास तसेच अपघात झालेल्या दिवसापासून 90 दिवसांच्या आत अपघातासंबंधी झाल्याबाबतचा दावा बँकेमार्फत विमा कंपनीकडे केल्यास खातेधारक किंवा त्याचे वारसास 1 लाखाची मदत विमा कंपनीकडून देण्यात येते.
यांची होती उपस्थिती
सदर प्रसंगी बँकेचे चेअरमन भालचंद्र पाटील, व्हा.चेअरमन डॉ.प्रकाश कोठारी, प्रबंध संचालक व सीइओ अनिल पाटकर, सहप्रबंध संचालक दिलीप देशमुख, न्यु इंडिया इन्शुरन्स लि.चे डिव्हीजनल मॅनेजर बी.टी. हिवाळे, सिनिअर ब्रँच मॅनेजर संदेश कमलाकर व डेव्हलपमेंट ऑफीसर गिरीश पोलडीया उपस्थित होते. सर्व ग्राहकांनी सुरक्षिततेच्या दृष्टीने प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा योजना, प्रधानमंत्री सुरक्षा विमा या योजना, रुपे एटीएम कार्डधारकासंबंधी असलेल्या विम्याची माहिती घेवून नोंदणी करुन घ्यावी असे आवाहन बँकेने केले आहे.