चिंबळी : मरकळ (ता. खेड) येथील ग्रामपंचायतीच्या वतीने आयोजित केलेल्या विशेष ग्रामसभेत स्त्री जन्माचे स्वागत करून मुली वाचविण्याची तसेच स्वच्छता राखण्याची शपथ ग्रामस्थांनी घेतली. सरपंच स्वाती लोखंडे ग्रामसभेच्या अध्यक्षस्थानी होत्या. याप्रसंगी कन्या रत्नाला जन्म देणार्या मातांचा सरपंच, उपसरपंच तसेच सर्व सदस्यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला. मरकळ ग्रामपंचायतीच्या वतीने 2011 पासून आजपर्यंत 134 महिलांना प्रशस्तीपत्रक देण्यात आले आहे. याबाबत सभेत माहिती देण्यात आली.
यांची होती उपस्थिती
या विशेष ग्रामसभेला सरपंच स्वाती लोखंडे, उपसरपंच उमेश वर्फे, संत तुकाराम सहकारी साखर कारखान्याचे संचालक व माजी सरपंच अनिल लोखंडे, अनिता लोखंडे, रोहिदास लोखंडे, लाला लोखंडे, गणेश लोखंडे, हनुमंत लोखंडे, नवनाथ लोखंडे, नीता लोखंडे, तृप्ती लोखंडे, मंगल खांदवे, राजश्री चव्हाण, जयश्री लोखंडे, तृप्ती काळुराम लोखंडे, खेड तालुका पंचायत समितीचे माजी सदस्य तुकाराम वहिले, दशरथ लोखंडे, बाजीराव लोखंडे, काळुराम लोखंडे, नवनाथ लोखंडे, सचिन लोखंडे, ग्रामसेवक मागाडे, कविता लोखंडे उपस्थित होते. या ग्रामसभेत गावातील विविध विकासकामांसाठी बक्षिस पत्राने खाजगी जागा उपलब्ध करून देणार्या दानशूर व्यक्तींचा उपस्थित मान्यवरांच्या हस्ते शाल व श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला.