आळंदी : येथील नवीन माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयातील विज्ञान शाखेचा निकाल 100 टक्के जाहीर झाला. यामुळे संस्थाचालक पदाधिकार्यांनी विद्यार्थ्यांसह शिक्षकांवर अभिनंदनाच वर्षाव केला. परिसरातील नामवंत शाळा म्हणून नवीन माध्यमिक विद्यालयाची ओळख वाढू लागली आहे. विज्ञान या शाखेतील प्रथम तीन क्रमांकमध्ये 71.69 टक्के मिळवून सिद्धेश वाबळे याचा प्रथम क्रमांक, 66 .62 टक्के मिळवून शरयु पाटीलने द्वितीय क्रमांक, 65 .85 टक्के मिळवून रणजित मोहितने तृतीय क्रमांक मिळविला.
वाणिज्य शाखेचा निकाल 98 .07 टक्के लागला. यात तीन क्रमांक मध्ये प्रथम शीतल लोखंडे, द्वितीय कावेरी ठाकूर, तृतीय रोशनी ठाकूर हिस मिळाला. कला शाखेचा निकाल 79 .59 टक्के लागला. यात प्रथम राणी कोळेकर, द्वितीय शितल काची, तृतीय अभिजित पँथर व बिभिषण पिंगळेला मिळाला. विद्यार्थी व मार्गदर्शक शिक्षकांचे संस्थेतर्फे विद्यालयाचे प्राचार्य एस. के. सुतार यांनी अभिनंदन केले. आळंदी जनहित फाउंडेशनच्यावतीने अध्यक्ष राजेंद्र घुंडरे यांनी संस्थाचालक, शिक्षणासह गुणवंत विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले.