मरकळ येथे विवाहितेची आत्महत्या

0

आळंदी : मरकळ (ता. खेड) येथे राहात्या घरात एका विवाहितेने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची माहिती आळंदी पोलिसांनी दिली. याबाबत राजू लिंबाजी लिपणे ( वय 35, रा. वाडा गावठाण, कोरेगाव भीमा, ता. शिरूर) यांनी फिर्याद दिली. मंगल लक्ष्मण लिपणे ( वय 25, रा. भुसे आळी, मरकळ, ता. खेड) असे आत्महत्या केलेल्या महिलेचे नाव आहे. पोलीससूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार लिपणे यांनी रहात्या घरातील पंख्याला नायलॉन दोरीने गळफास घेऊन आत्महत्या केली. याबाबतचे कारण समजू शकले नसून, पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक डी. एल. शिंदे करीत आहेत.