मराठवाडा जनविकास संघ व श्री क्षेत्र भंडारा डोंगर समिती यांच्यावतीने केले वृक्षारोपण

0

भंडारा डोंगरावर पाचशे झाडांची केली लागवड
संगोपन ट्रस्टच्यावतीने होणार पाण्याची व्यवस्था

पिंपरीः मराठवाडा जनविकास संघ व श्री क्षेत्र भंडारा डोंगर समिती यांच्यावतीने पाचशे वृक्षांची जाळीसह भंडारा डोंगर येथे लागवड करण्यात आली. यामध्ये वड, चिंच, जांभळ, पिंपळ, आवळा, कडूलिंब, तुती, वाकुळ, उंबर, रूई अशी झाडे लावण्यात आली. यावेळी झाडे लावून त्यांचे पुढील तीन वर्षे पाण्याची व्यवस्था संगोपन ट्रस्टच्यावतीने करण्यात येणार आहे. सध्या दिवसेंदिवस प्रदुषण वाढते आहे. त्यामुळे वृक्षतोड खूप मोठ्या प्रमाणात होते आहे. त्यामुळे झाडांची गरज वाढत जाते आहे. त्यासाठीच मराठवाडा जनविकास संघाततर्फे भंडारा डोंगरावर मोठ्या प्रमाणात वृक्षारोपण करण्यात आले.

आमदार संजय भेगडे, ह.भ.प. शिवानंद महाराज, ह.भ.प. बबृवान वाघ महाराज, ह.भ.प. कुरेकर बाबा महाराज, ह.भ.प. बाबूराव महाराज तांदळे, शिवव्याख्याते गजानन वाव्हळ, ढमाले महाराज, माजी नगरसेवक आप्पा बागल, सरपंच रंजनाताई शेंडे, ट्रस्टचे अध्यक्ष अरुण पवार, स्वीकृत नगरसेवक गोपाळ माळेकर, ग प्रभाग अध्यक्ष बाबासाहेब त्रिभुवन, माधव मनोरे, नितिन ताटे, सारिका भोजने, कीर्ती पडवळ, अंकुश ढोरे, वर्षा गाडे, जालिंदर गाडे, रवींद्र दाभाडे, कैलास भेगडे, राजेंद्र सरोदे, विठ्ठलराव शिंदे, जगन्नाथ नाटक पाटील, गोपाळ शेठ, रंगनाथ पवार, रामभाऊ कराळे, दत्तोबा कराळे, अरविंद शेवकर, अरुणराव काशीद, दामोदर शिंदे, नारायणराव भेगडे, प्रशांत ढोरे, दीपक जाधव, अनिसभाई पठाण, मुंजाजी भोजने, सुनील नाईकनवरे, मुकेश पवार, प्रकाश बंडेवार, किशोर आट्टरगेकर, दत्ता असवले, सखाराम वालकोळी, युवराज नलावडे, भरत शिंगोटे, प्रकाश इंगोले, गजानन माने, उमाकांत तळवडे, भारतीय योग संस्थान, नव चैतन्य हास्ययोग परिवार, संत गाडगेबाबा जेष्ठ नागरिक संघ, भैरवनाथ जेष्ठ नागरिक संघ, भीष्माचार्य ज्येष्ठ नागरिक संघाचे पदाधिकारी आदी पाहुण्यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले.

जनविकास संघाचा स्तुत्त्य उपक्रम
गजानन वाव्हळ म्हणाले की, मराठवाडा जनविकास संघाने हाती घेतलेला उपक्रम स्तुत्य आहे. जगद्गुरु तुकाराम महाराजांनीही ‘वृक्षवल्ली आम्हा सोयरे वनचरी’ असे म्हटलेले आहे. त्यामुळे भंडारा डोंगर परिसरात करण्यात आलेली वृक्षलागवड अनुकरणीय आहे. वृक्ष भेदभाव करीत नाहीत. त्याप्रमाणे सर्वांचे आचरण असले पाहिजे. प्रत्येकाने झाडे लावत पर्यावरणाचे रक्षण करावे. वृक्ष आपले सखेसोबती आहेत. आज मोठया प्रमाणात वृक्षतोड होत असल्याने जमिनीची धूप होत आहे. अवेळी पावसाचे आगमन वातावरणातील प्राणवायू संपुष्टात येत आहे. भविष्यात अशीच परिस्थिती राहिल्यास अनेक समस्यांना सामोरे जावे लागणार आहे. प्रत्येकाने वृक्षारोपण करणे ही काळाची गरज बनली आहे. ही गरज ओळखून रोपाची लागवड करून त्याचे संगोपन केले पाहिजे, असे त्यांनी सांगितले. तरुणांनी वारकरी संप्रदाय समजून घेऊन सहभाग वाढविण्याची गरज आहे. त्यांना त्यांच्याच भाषेत अध्यात्म समजावून सांगावे लागणार आहे

वृक्षाची जोपासना करण्याची गरज
अरुण पवार यांनी सांगितले की, आपण जर प्रत्येकाने एक झाड जगवणारच, अशी जबाबदारी घेतली तर सर्वत्र वनराई झाल्याशिवाय राहणार नाही. येणार्‍या काळात या वृक्ष लागवडीचा फायदा होणार आहे. वृक्षारोपण करून प्रत्येकाने वृक्षाची जोपासना करणे. ही काळाची गरज आहे. वृक्ष नसतील तर पावसाबरोबरच अनेक समस्या उद्भवतील. गेल्या काही वर्षात वृक्षतोड मोठया प्रमाणात झाल्याने त्याचा विपरीत परिणाम जनसामान्यांवर, येथील वातावरणावर झालेला दिसून येत आहे. वृक्षतोड होतानाच वृक्षलागवड करून त्याची जोपासना केली जात नसल्याचे प्रकर्षाने जाणवते. प्रत्येकाने वृक्षारोपण करून त्या वृक्षाची जोपासना करण्याची गरज आहे.