मराठवाड्याच्या ऐतिहासिक ठेवा असलेला नवा मराठी सिनेमा ‘रॉमकॉम

0

मुंबई: ‘मराठवाडा’ महाराष्ट्रातील ऐतिहासिक ठेवा आहे. अनेक राजांची राजवट, निजामशाही येथे नांदली. त्यामुळे येथील भारतीय संस्कृती, धर्म, अर्थ, कला आणि वाङमयात विविधता आढळते. हा भूप्रदेश नानाविध कलांनी समृद्ध आहे. मराठवाड्याचे ऐतिहासिक सौंदर्य, संत, सत्पुरुष, मठ, मंदिर, घराणी, गुरुद्वारे, लेण्या, गडकोट, वाड्मय, संस्कृती अशी अनेक वैशिष्ट्यं. मराठवाड्याच्या या समृद्ध परंपरेत दाखल होतो आहे एक नवा मराठी सिनेमा रॉमकॉम.

नेहमीपेक्षा वेगळ्या भागात घडणाऱ्या या चित्रपटाबद्दल कलाकारही उत्सुक असून त्यांच्याही आजवरच्या भूमिकांपेक्षा हटके भूमिका चित्रपटात असल्याचे अभिनेता असित रेड्डीने सांगितले. प्रेमकथा, अॅक्शन आणि विनोद यांचा संगम असलेला प्रेक्षकांचे मनोरंजन करणारा चित्रपट म्हणून रॉमकॉम ओळखला जाईल असा ठाम विश्वास मधुरा आणि विजय या नवोदित जोडीला आहे. तीस दिवसांचे शूटिंगचे सत्र हे स्थानिकांच्या अमूल्य सहकार्यामुळे पूर्ण होऊ शकले, त्यांच्या आदरातिथ्याने चित्रपटाची टीम भारावून गेल्याचे क्रिएटिव्ह हेड मृदुला वैभव आणि वेशभूषाकार शीतल पावसकर यांनी सांगितले. ‘रॉमकॉम’चे चित्रीकरण पूर्ण झाले असून लवकरच प्रदर्शनाची तारीख जाहीर होईल, असे निर्माते सचिन शिंदे यांनी सांगितले.