मराठा आंदोलक आक्रमक : कायगावला एकाची गोदावरीत आत्महत्या

0

जमाव हिंसक : वाहतुकीची कोंडी : जळगाव जिल्ह्यातील वाहनधारकांनी नगर जाण्यासाठी शिर्डीमार्गे प्रवास करण्याचे आवाहन

भुसावळ : मराठा समाजाला आरक्षण मिळण्यासाठी औरंगाबादेत मराठा क्रांती मोर्चाचे कार्यकर्ते आक्रमक झाले असून आरक्षणाच्या मागणीसाठी अहमदनगर रोडवरील कायगाव येथील गोदावरी पात्रात उडी घेतल्याने त्याचा मृत्यू ओढवल्यानंतर जमाव प्रचंड हिंसक झाला असून रस्ता रोकोने दूरपर्यंत वाहनाच्या रांगा लागल्या आहेत. जळगाव जिल्ह्यातील वाहनधारकांनी अहमदनगर जाण्यासाठी शिर्डीमार्गे प्रवास करण्याचे आवाहन पोलीस प्रशासनाने केले आहे. मराठा आरक्षणासाठी मराठवाड्यातील आंदोलनाने सोमवारी आक्रमक स्वरूप घेतले. सोमवारी दुपारी 3.30 वाजेच्या दरम्यान औरंगाबाद – नगर रोडवरील कायगाव येथे गोदावरी पात्रावरील पुलावर मराठा क्रांती मोर्चाच्या कार्यकर्त्यांनी आंदोलन केले. याचवेळी काकासाहेब शिंदे (नागड, कानडगाव, गंगापूर) या कार्यकर्त्याने पुलावरून नदीपात्रात उडी घेतल्याने त्यांचा मृत्यू झाला.

आंदोलकांनी केला चक्का जमा
नगर रोडवर मराठा मोर्चाच्या आंदोलकांनी या घटनेनंतर रास्तारोको केले असून या मार्गावरील वाहतूक पूर्णपणे ठप्प झाल्याने वाहनधारक कोंडीत अडकले आहेत तर जमाव हिंसक बनला आहे. गंगापूर तालुक्यातील सकल मराठा समाजातील विविध पक्षांच्या पदाधिकार्‍यांनी मराठा आरक्षण आणि इतर मागण्यांसाठी जिल्हाधिकार्‍यांना एक निवेदन दिले होते. यात त्यांनी सोमवारी कायगाव येथील गोदावरी नदीच्या पुलावरून उडी मारून सामूहिक जलसमाधी घेण्याचा इशारा दिला होता. दरम्यान, आंदोलनामुळे नगर-अहमदनगर राज्यमार्ग ठप्प झाला आहे.

जळगाव जिल्ह्यातील वाहनधारकांना आवाहन
अहमदनगर जाणार्‍या जळगाव जिल्ह्यातील वाहनधारकांनी शिर्डीमार्गे प्रवास करावा, असेआवाहन सोनई, ता.नेवासा पोलीस निरीक्षक किरण शिंदे यांनी केले आहे. वाहनधारकांना काही अडचणी असल्यास त्यांनी मोबाईल 8329008302 या भ्रमणध्वनीवर संपर्क साधावा, असे आवाहनही निरीक्षक शिंदे यांनी वाहनधारकांसह नागरीकांना केले आहे.