मराठा आरक्षण:पुणे महापालिकेत गदारोळ

0

पुणे-मराठा समाजाला आरक्षण मिळाले पाहिजे या मागणीसाठी राज्यात आंदोलन सुरू आहे. या आंदोलनाचे पडसाद आज पुणे महापालिकेतही बघायला मिळाले. शिवसेने मराठा आरक्षणाला आणि आंदोलनाला पाठिंबा दिला आहे. त्यावरूनच पुणे महापालिकेत राडा झाला. भाजप विरोधात विरोधकांनी आंदोलन केले.

मराठा आरक्षणावर भूमिका मांडण्यात यावी.अशी मागणी महापौर मुक्ता टिळक यांच्याकडे विरोधकानी केली.मात्र त्यावर काही बोलू दिल्याने त्याच्या निषधार्थ शिवसेना गटनेते संजय भोसले यांनी महापौरांसमोरील मानदंड उचलण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी भाजप नगरसेवक दीपक पोटे यांनी मानदंड बाजूला घेतला.त्यामुळे संजय भोसले यांनी महापौरासमोरील साहित्य फेकून दिले.त्यामुळे शिवसेनेच्या नगरसेवकाच्या अंगावर भाजप नगरसेवक धाव गेले.

सेनेच्या नगरसेवकावर कारवाई करावी

या घटनेमुळे सभागृहात तणावाचे वातावरण निर्माण झाले.तर भाजप आणि विरोधकानी एकमेका विरोधात घोषणाबाजी केली.सभागृहातील परिस्थिती लक्षात घेता.महापौर मुक्ता टिळक यांनी सभा तहकूब केली.महापौरा समोरील साहित्य फेकून दिल्याच्या निषेधार्थ शिवसेनेच्या नगरसेवकावर कारवाई करावी अशी मागणी देखील भाजप नगरसेवकाकडून सभागृहात करण्यात आली.