मराठा आरक्षणाचा अहवाल १५ नोव्हेंबरपर्यंत येणार – चंद्रकांत पाटील

0

नाशिक : आरक्षणासाठी मराठा क्रांती मोर्चानं पुन्हा राज्यभर आंदोलन करण्याचा इशारा दिल्यानंतर महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी मराठा आरक्षणाबाबत महत्त्वपूर्ण विधान केलंय. सरकार मराठा आरक्षण निश्चितच देणार आहे. त्यासंबंधीचा  समितीचा अहवाल १० ते १५ नोव्हेंबरपर्यंत येणार असून कायद्याच्या कसोटीवर उतरणारं आरक्षण असेल, असं चंद्रकांत पाटील यांनी सांगितलं आहे. पिंपळगाव बसवंत येथील सभेत पाटील यांनी ही माहिती दिली आहे.

पिंपळगाव बसवंत येथील सभेत चंद्रकांत पाटील यांनी सरकारच्या विविध कामांची माहिती दिली. तसेच मराठा आरक्षणासंबंधी महत्त्वपूर्ण विधानही केलं. त्यासोबतच भीमा-कोरेगाव आंदोलकांवरील गुन्हे मागे घेण्याचा निर्णय मुख्यमंत्र्यांनी घेतला. यात उद्धव ठाकरे यांचा महत्वाचा सहभाग होता, असंही पाटील यांनी यावेळी सांगितलं.