मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून विधिमंडळात गदारोळ

0

मुंबई- राज्य विधिमंडळाचे हिवाळी अधिवेश सुरु आहे. मराठा आरक्षणावरून आज विधिमंडळ सभागृहात विरोधकांनी मोठा गदारोळ केला. त्यावेळी विरोधकांनी सरकारला आरक्षणाच्या मुद्द्यावरून चांगलेच धारेवर धरले आहे. धनगर समाजाचा अहवाल पटलावर ठेवावा, मुख्यमंत्र्यांनी धनगर समाजाला आरक्षण देतो, असे सांगितले होते, परंतु आता त्यांनी हा विषय केंद्राकडे असल्याचे सांगून हात झटकले आहे असे आरोप माजी उपमुख्यमंत्री राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते अजित पवार यांनी केले.

शिक्षणाच्या बाबतीत 5 टक्के मुस्लिमांना दिलेले आरक्षण हायकोर्टाने मान्य केले आहे, मराठा समाजालाही आरक्षण मिळालेच पाहिजे असेही त्यांनी सांगितले.

जर आलेला मागासवर्ग आयोगाचा अहवाल सभागृहात ठेवल्यास घटनात्मक पेच निर्माण होणार असेल तर अहवाल आणूच नका, ओबीसी घटकाला हिस्सा काढून घेतोय का असे वाटू लागले आहे. उद्या मागासवर्ग आयोगाचा अहवाल ठेवला की लगेच कोर्टात जाऊन स्थगिती आणायलाही काही जण तयार आहेत, इतरांना त्रास न होता मराठा समाजाला आरक्षण दिले पाहिजे. मराठा आरक्षणावर कोणीही राजकारण करू नये, विरोधी काही जणांना असेही वाटते हे पुढे टिकू नये, असाही मनातून इच्छा असणारा एक वर्ग आहे. मराठा समाजाला आरक्षण देत असताना घटनात्मक आणि कायद्याच्या चौकटीत पेच निर्माण होता कामा नये, कायद्याच्या चौकटीत बसणारे आरक्षण द्यावे, असेही अजित पवार म्हणाले आहेत.