मुंबई- अॅड. गुणरत्न सदावर्ते यांनी महाराष्ट्र सरकारने मराठा समाजाला आरक्षण देऊन घटनाबाह्य निर्णय घेतला आहे. घटनेनुसार ५० टक्के पेक्षा अधिक आरक्षण देता येत नाही. त्यामुळे आरक्षण रद्द करावे अशी याचिका उच्च न्यायालयात दाखल केली होती. यावेळी, तातडीने आरक्षणाला स्थगिती देण्यास उच्च न्यायालयाने नकार दिला. तसेच या प्रकरणी २०१४ सालीही एक याचिका दाखल झाली होती, त्या याचिकेवर आणि गुणरत्न सदावर्तेंच्या याचिकेवर येत्या १० डिसेंबर रोजी सुनावणी घेतली जाईल असे न्यायालयाने स्पष्ट केले आहे.
मराठा आरक्षणाविरोधात न्यायालयात धाव घेणाऱ्या जयश्री पाटील यांचे वकील गुणरत्न सदावर्ते हे अनुपस्थित राहिल्याने मराठा आरक्षणवर तातडीने सुनावणी घेण्यास मुंबई उच्च न्यायालयाने नकार दिला होता. मात्र, दुपारी 3 वाजता न्यायालयाने यावर सुनावणी पूर्ण केली. त्यानुसार मराठा आरक्षणाला स्थगिती देण्यास उच्च न्यायालयाने तूर्तास नकार दिला आहे.