मुंबई: मराठा आरक्षण आणि वैद्यकीय प्रवेशाबाबतचे प्रकरण न्यायलयात गेले आहे. सर्वोच्च न्यायलयात याचिका दाखल करण्यात आली आहे. यावर तातडीने सुनावणी घेण्याची मागणी करण्यात आली होती. मात्र सुनावणी पुढे ढकलण्यात आली असून पुढील सुनावणी १ सप्टेंबरला होणार आहे. त्यामुळे सरकारला आपली बाजू मांडण्यासाठी पुरेसा वेळ मिळाला आहे. व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे सुनावणी करण्यात अडचण येत आहे, त्यामुळे सविस्तर सुनावणी करण्याची मागणी राज्य सरकारने केली आहे. त्यामुळे आता ही सुनावणी पुढे ढकलण्यात आली आहे.
कोरोना आटोक्यात येईपर्यंत कोणत्याही प्रकारची नोकर भरती केली जाणार नाही असे राज्य सरकारने स्पष्ट केले आहे.
प्रवेश प्रक्रियेला स्थगिती देण्यात आलेली नाही. सुनावणी घटनापीठाकडे व्हावी अशी मागणी करण्यात आलेली आहे.