मराठा आरक्षणासंदर्भातील मागासवर्ग आयोगाचा अहवाल सादर करा – उच्च न्यायालय

0

मुंबई : मराठा आरक्षणासंदर्भातील राज्य मागासवर्ग आयोगाच्या अहवालाची प्रत सादर करा, असे निर्देश मुंबई उच्च न्यायालयाने राज्य सरकारला दिले आहेत.

मराठा आरक्षणासंदर्भात मुंबई उच्च न्यायालयात विविध याचिका दाखल झाल्या आहेत. या याचिकांवर बुधवारी उच्च न्यायालयात सुनावणी झाली. सुनावणीदरम्यान, मुंबई उच्च न्यायालयाने राज्य सरकारला राज्य मागासवर्ग आयोगाचा मराठा आरक्षणासंदर्भातील संपूर्ण कृती अहवाल सादर करण्याचे निर्देश दिले. बुधवारी किंवा गुरुवारी हा अहवाल सादर केला जाईल. यानंतर सोमवारी पुढील सुनावणी होईल. याचिकाकर्त्यांना या अहवालाची प्रत कशी उपलब्ध करुन द्यायची, यासंदर्भात सोमवारी सुनावणी होणार आहे.

६ फेब्रुवारीपासून मराठा आरक्षणासंदर्भातील याचिकांवर अंतिम सुनावणीस सुरूवात होणार आहे. मेगाभरतीवरील स्थगिती तूर्तास उठवण्याची राज्य सरकारची मागणी उच्च न्यायालयाने फेटाळून लावली आहे. ६ फेब्रवारीपर्यंत मराठा आरक्षणाच्या अंमलबजावणीवर स्थगिती कायम  असणार आहे.