मराठा आरक्षण टिकेल की नाही; बघा काय बोलले शरद पवार !

0

रायगड – मराठा आरक्षणाविरोधात न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली आहे. मराठा आरक्षण टिकेल की नाही याबाबत अनेकांना प्रश्न पडला आहे. दरम्यान राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष खासदार शरद पवार यांना मराठा आरक्षणासंदर्भात प्रश्न विचारण्यात आला असता त्यांनी भाजप अध्यक्ष अमित शहा यांच्या वक्तव्याचा आधार घेत पुढे काय होईल हे माहित नाही असे उत्तर दिले.

भाजपाध्यक्ष अमित शहा यांनी तेलंगणामध्ये ५० टक्क्यांपेक्षा अधिकचे आरक्षण टिकणार नाही, असे विधान केले होते. त्यामुळे भाजप अध्यक्षांनी मुख्यमंत्र्यांना मार्गदर्शन करावे असा टोमणा देखील शरद पवार यांनी हाणला.