मुंबई- राज्य सरकारने मराठा समाजाला सामाजिक व आर्थिक निकषावर आधारित दिलेले १६ टक्के आरक्षण रद्द करण्यात यावी अशी मागणी एमआयएमचे आमदार इम्तियाज जलील यांनी केली आहे. त्यांनी मुंबई उच्च न्यायालयात धाव घेत याचिका दाखल केली आहे. याचिकेत त्यांनी मराठा आरक्षण तातडीने रद्द करण्याची मागणी केली आहे. तसेच मागासवर्ग आयोगाचा अहवालही रद्द करण्यात यावा अशी मागणी त्यांच्याकडून करण्यात आली आहे.
राज्यात मुस्लिम आरक्षणाचा मुद्दा प्रलंबित असून त्यावर अद्याप कोणताही निर्णय झाला नसून, जाणुनबुजून डाववलं जात असल्याचा आरोप याचिकेत करण्यात आला आहे. मुस्लिम समाजासाठी आरक्षण मंजूर केलं जावं अशी मागणी याचिकेत करण्यात आली आहे.