हे देखील वाचा
मुंबई – राज्यात मराठा आरक्षण लागू होवू नये अशी भूमिका मुख्यमंत्र्यांची आहे. जेव्हा आरक्षण देण्यात आले त्यावेळी मुख्यमंत्री सांगत होते की, कोर्टात टिकणार नाही. कोर्टात बाजू नीट मांडली गेली नाही ही वस्तुस्थिती होती. आणि आता सन्मानिय न्यायालयाचे न्यायाधीश स्वत: मराठा आरक्षणाचं काय झालं? आरक्षणाचा अहवाल कधी सादर करणार असं विचारत आहे याचा अर्थ टाळाटाळ करण्याची भूमिका या सरकारने घेतली आहे असा आरोप राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय प्रवक्ते नवाब मलिक यांनी मिडियाशी बोलताना केला. मराठा आरक्षणावरुन न्यायालयाने सरकारला फटकारल्यानंतर मराठा आरक्षणाबाबत सरकारच्या भूमिकेवर नवाब मलिक यांनी जोरदार हल्ला केला.
समाजकल्याण मंत्रालयाच्या मागासवर्गीय विभागाकडे अहवाल तयार करण्याची जबाबदारी दिली आहे. या विभागाने भाजपाच्या‘सारथी’ नावाच्या संस्थेकडे अहवाल तयार करण्यासाठी दिला आहे. त्यांना आदेश देवून अहवाल तयार होत नाही. सरकारची भूमिका स्पष्ट आहे या राज्यात मराठा, मुस्लिम आरक्षण लागू होवू नये यासाठी सरकार टाळाटाळ करण्याची भूमिका घेत आहे. आता कोर्टाने भूमिका घेतल्यानंतर नाईलाजाने सरकारला अहवाल सादर करावा लागणार आहे असेही नवाब मलिक म्हणाले.