मुंबई-मराठा समाजाला आरक्षण देण्याची गेल्या अनेक दिवसांपासून मागणी होत आहे. मागासवर्ग आयोगाचा अहवाल प्राप्त झाला आहे. येत्या २९ नोव्हेंबर रोजी याबाबत अध्यादेश काढणार असल्याचे मुख्यमंत्री यांनी काल जाहीर केले आहे. दरम्यान आज मराठा आरक्षणावर चर्चा करण्यासाठी सर्वपक्षीय बैठक बोलविण्यात आली आहे. या बैठकीला सुरुवात झाली आहे.
विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांनी ही बैठक बोलविली आहे. या बैठकीत मुख्यमंत्री, कॅबिनेट उपसमिती, विरोधी पक्षातील नेते उपस्थित राहणार आहे.