मराठा क्रांती मोर्चातर्फे आण्णाभाऊ साठे जयंती साजरी

0

चाळीसगाव । मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने शहरातील हिरापूर रोड स्थित मराठा क्रांती मोर्चा कार्यालयात आण्णाभाऊ साठे जयंतीनिमित्त प्रतिमा पुजन राष्ट्रीय शिक्षण प्रसारक मंडळाचे संचालक शेषराव पाटील व जिल्हा दुध संघाचे संचालक प्रमोद पाटील यांच्या हस्ते करण्यात आली. यावेळी कार्यक्रमास लक्ष्मण शिरसाठ, गणेश पवार, भैय्यासाहेब पाटील, अरुण पाटील, योगेश पाटील, बंडु पगार, कैलास गावडे नांद्रे, माजी सरपंच रविंद्र शिवराम पाटील, गिरीश पाटील, सुनील पाटील, अनिल शिरसाठ, सुरेंद्र महाजन, बापु कुमावत, सुनील कुमावत, अविनाश काकडे, विष्णु महाले, दिवाकर महाले, ज्ञानेश्वर महाले, ज्ञानेश्वर पाटील आदि उपस्थित होते.