मराठा तरूणांना व्यापाराबाबत करणार मार्गदर्शन

0
सकल मराठा समाजाने केले आयोजन
पिंपरी : अखिल भारतीय युवक मराठा महासंघाच्या व सकल मराठा समाजाच्यावतीने इच्छुक तरूण व तरूणींसाठी उदयोग व व्यापाराबाबत मार्गदर्शन करण्यात येणार आहे. कै.आण्णासाहेब पाटील महामंडऴाकडून कशा प्रकारे अर्थपुरवठा केला जातो या बाबतचे मार्गदर्शन दिले जाणार आहे. या कार्यक्रमाला मंडऴाचे अध्यक्ष व माजी आमदार नरेंद्र पाटील उपस्थित राहणार आहेत. हा कार्यक्रम दि.24 रोजी पिंपरीतील क्रीस्टल हॉटेल येथे पार पडणार आहे. आर्थिकदुष्ट्या मागासलेल्या मराठा समाजातील बेरोजगार तरुणांना व्यापार, उद्योग, स्वतःच्या पायावर उभे राहणाची इच्छाशक्ती असलेल्या सर्व तरुणांसाठी 50 हजार ते 50 लाखांपर्यंत बिनव्याजी कर्ज कसे उपलब्ध होते याबाबत माहिती दिली जाणार आहे. तरी याचा सर्व मराठा समाजाने सक्रिय सहभाग घ्यावा, असे आवाहन युवक मराठा महासंघाते प्रदेश सरचिटणीस दशरथ पिसाळ यांनी केले.
या मार्गदर्शन शिबीरात आण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाचा बिनव्याजी कर्जाचा लाभार्थी होण्यासाठी किंवा मंडऴाच्या विविध योजनांच्या कर्जाचे प्रकार अटी-शर्तींची पुरेपूर माहिती दिली जाणार आहे. वैयक्तिक कर्ज व्याज परतावा योजना, गट प्रकल्प कर्ज व्याज परतावा योजना, गट प्रकल्प कर्ज योजना आदी योजना असून यासाठी पात्रता प्रमाणपत्र, महास्वयंम प्रणालीवर युजर आयडी-पासवर्ड, कागद पत्राची पूर्तता, प्रोजेक्ट रिपोर्ट, बँकेत कर्ज मंजुरीपत्र, महामंडळाकडून व्याज परतावा आदी महत्वाची कागदपत्रे गरजेची आहेत. तसेच वरील सर्व पूर्तता युवक मराठा महासंघाकडून लाभार्थ्यांना पूर्ण करून देणार आहे. दि.24 ते 31 ऑक्टोबर 2018 या दरम्यान लाभार्थ्यांची नोंदणी करणार आहे. 8 दिवसात जितकी नोंदणी होईल त्या सर्वांना कर्ज मिळेपर्यंत पुढील नवीन लाभार्थ्यांची नोंदणी बंद ठरवण्यात येणार आहे. वरील कालावधीत नोंदणी करण्यासाठी दशरथ पिसाळ-7721041999 किंवा संतोष लांडगे-9689810008 यांच्याशी संपर्क साधावा.