पिंपरी -चिंचवड : शहरातील 10 तरुण म्हणजेच ‘मराठा वॉरियर्स टीम’ एकत्र येऊन एका अनोख्या सायकल मोहिमेवर जाणार आहेत. भारतीय सेना बॉर्डरवर तैनात असते. त्यांना कृतज्ञता म्हणून ते पुणे ते वाघा बॉर्डर अशी सायकल मोहीम करणार आहेत. महाराष्ट्र, गुजरात, राजस्थान व पंजाब अशा चार राज्यातून 18 दिवस प्रवास करुन 10 सायकलस्वार 2000 किमी पूर्ण करणार आहेत. यामध्ये राम फुगे, निलेश धावडे, प्रज्ञेश मोळक, प्रशांत जाधव, संतोष दरेकर, बजरंग मोळक, विजय हरगुडे, संदीप शिंदे, विश्वास काशिद व आठ वर्षीय अंशुमन धावडे अशी ही टीम आहे. गेली चार महिने संपूर्ण टीम सराव करत आहे. मोहिमेचा प्रारंभ गुरुवारी (दि.14) सकाळी 8 वाजता अंकुशराव लांडगे सभागृह भोसरी येथे खासदार संभाजीराजे छत्रपती (कोल्हापूर) यांच्या हस्ते होणार आहे.