मराठा समाजाने अनावश्यक खर्च टाळून साधेपणाने लावावेत विवाह

0

जिल्हाधिकारी किशोरराज निंबाळकर : समाजाने कालबाह्य रूढी-परंपरा बाजूला सारून शिक्षण क्षेत्रात वळण्याची गरज

रावेर- मराठा समाजाने जुन्या कालबाह्य रुढी परंपरेला बाजूला ठेवून शैक्षणिक क्षेत्राकडे वळावे, घरातील प्रत्येकाने नोकरी-व्यवसायात सर्व स्तरात काम करण्याची धमक ठेवावी समाजात वाचन संस्कृती वाढविण्याची गरज आहे, कुटुंबातील दोन पिढ्यांमध्ये दरी निर्माण झाली असून त्यासाठी घरामध्ये एकमेकांमध्ये संवाद वाढविण्याची आवश्यकता असून लग्नामध्ये अनावश्यक खर्चामुळे समाजाची आर्थिक स्थिती ढासळलेली असून त्यासाठी लग्नामध्ये अनावश्यक खर्च टाळून साधेपणाने विवाह समारंभ लावावेत, असे आवाहन जिल्हाधिकारी किशोरराजे निंबाळकर यांनी केले. मराठा समाज विकास मंडळातर्फे तालुक्यातील विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा रविवारी झाला. प्रसंगी जिल्हाधिकारी निंबाळकर बोलत होते.

यांची व्यासपीठावर उपस्थिती
व्यासपीठावर कार्यक्रमाचे अध्यक्ष उद्योजक बी.डी.चौधरी यांच्यासह प्रांताधिकारी अजित थोरबोले, उद्योजक श्रीराम पाटील, उद्योजक आर.एस.पाटील, सहाय्यक पोलिस निरीक्षक दत्तात्रय निकम, गोपाल दर्जी, शहापूर नगराध्यक्ष शोभा लांडे, जिल्हा परीषद सदस्य रंजनाबाई प्रल्हाद पाटील, रावेर मुख्याधिकारी रवींद्र लांडे, किशोर चव्हाण, मुख्याध्यापक संघाचे जिल्हाध्यक्ष जे.के.पाटील, पोलिस उपनिरीक्षक राहुल वाघ, जनपद अध्यक्ष किशोर पाटील, डॉ.राजेंद्र पाटील, सुधाकर पवार, पितांबर पाटील, राजेंद्र चौधरी, सुरेश चिंधु पाटील आदी उपस्थित होते. प्रसंगी तालुकाभरातील दहावी, बारावी, पदवी-पदविका, राज्यस्तरीय, राष्ट्रीय स्तरावरील स्पर्धेत यश मिळविलेल्या विद्यार्थ्यांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.

यांनी घेतले परीश्रम
अंबादास महाजन, डॉ.एस.आर.पाटील, यादवराव पाटील, काशिनाथ चौधरी, अर्जुन पाटील, डॉ.मनोहर पाटील, कडू पाटील, आर.बी.महाजन, अ‍ॅड.व्ही.पी.महाजन, संतोष महाजन, युवराज महाजन, अर्जुन महाजन, योगेश महाजन, राजेश महाजन, घनश्याम महाजन, घनश्याम पाटील, प्रशांत पाटील, विनोद चौधरी आदी समाज बांधवांनी परीश्रम घेतले.