मुंबई । मुंबई येथील मराठी नाट्य व्यवस्थापक संघांची 7 जून 2018 रोजी सर्वसाधारण सभा आयोजित करण्यात आली होती. यासभेत नवीन कार्यकारिणीची निवड सर्वानुमते करण्यात आली तसेच संघाच्या विविध विषयांवर चर्चा झाली. या सभेस जे सभासद गैरहजर होते त्यांना सभेचा तपशिलवार वृतांत कळवण्यात येणार असल्याचे संघाच्या वतीने सांगण्यात आले आहे.
मराठी नाट्य संघाच्या सभेमध्ये माजी अध्यक्ष प्रभाकर (गोट्या) सावंत हे उपस्थित राहिले होते. यावेळी सर्वानुमते त्यांची नवीन कार्यकारिणीमध्ये प्रमुख सल्लागार म्हणून निवड करण्यात आली.संघाच्या वतीने त्यांचे अभिनंदन करून त्यांना शुभेच्छा देण्यात आल्या तसेच यावेळी प्रमुख सल्लागार प्रभाकर (गोट्या) सावंत यांनी सर्व बुकिंग क्लार्क यांना व्यवस्थापक संघामध्ये सामील करण्यात घ्यावे, अशी सूचना करण्यात आली आहे. या सूचनेनुसार पुढील सभेमध्ये सर्व बुकिंग क्लार्क यांना निमंत्रण देऊन त्याबद्दलचे सर्व निर्णय घेण्यात येणार आहेत.
नवी कार्यकारिणी
अध्यक्ष- मंगेश कांबळी, उपाध्यक्ष-प्रकाश सावंत, कार्यवाह- हरी पाटणकर,खजिनदार- नितीन नाईक, कार्यकारणी सदस्य- श्रीकांत पवार, प्रणित बोडके, श्रीकार कुलकर्णी, कपिल चंदन, प्रवीण दळवी, दीपक गोडबोले, नंदू पणशीकर आणि प्रमुख सल्लागार- प्रभाकर (गोट्या) सावंत. दरम्यान, व्यवस्थापक संघाच्या या सभेमध्ये गोट्या सावंत यांनी बुकिंग क्लार्क यांना व्यवस्थापक संघात सामील करून घ्या, असा ठराव मांडला होता. या ठरावाला सर्वांनी मंजुरी दिली तसेच बुकिंग क्लार्कचे मानधन 4 दिवसांचे 1200 रुपये करण्यात यावे, असे व्यवस्थापक संघाचे अध्यक्ष मंगेश कांबळी यांना सांगितले. याबाबत व्यवस्थापक संघ आणि बुकिंग क्लार्क संघाची एकत्रित सभा सोमवार 25 जून रोजी दुपारी 12 वाजता शिवनेरी हॉल, शिवाजी मंदिर दादर येथे आयोजित करण्यात आली आहे.