जळगाव । मेहरूण तलावामध्ये येणार्या पाण्याचा मोठा स्त्रोत असलेला अंबरझरा तलावाचे सफाई अभियानास आज मराठी प्रतिष्ठानचे सचिव विजय वाणी यांच्या हस्ते पोकलँड मशीन व नारळ वाढवून कामास प्रारंभ करण्यात आला. याप्रसंगी प्रतिष्ठानचे अध्यक्ष अॅड. जमील देशपांडे, उपाध्यक्ष प्रमोद बर्हाटे, संत नरहरी सोनार बहुउद्देशीय संस्थेचे प्रशांत सोनार, माजी नगरसेवक प्रशांत नाईक, तळवळकर जिमचे किशोर जाधव, श्री ग्रृप मित्र मंडळाचे संदिप मांडोळे आदी उपस्थित होते.
गेट समोरील माती आणि झुडूंप काढले
ब्रिटीशकालीन नियोजन असलेले अंबरझरा तलावाला दोन मोठे गेट बनविण्यात आले आहेत. माती आणि झुडूंपामुळे गेट बंद झालेले होते. आज गेट समोरील माती व झाडेझुडपे काढण्याचे काम हाती घेण्यात आले. संपुर्ण लाकसहभागातून पाटचारी सफाई अभियान राबविण्यात येणार आहे. अंबरझरा तलाव ते मेहरूण तलाव हे अंतर 3 किमी एवढे असून साधारणतः एका आठवडा सफाई अभियान राबविण्यात येणार आहे. या अभियानात संत नरहरी सोनार बहुउद्देशीय संस्था, श्री ग्रृप मित्र मंडळ, पंचरत्न प्रतिष्ठान, वाजीद फाऊंडेशन या सामाजिक संस्थांच्या सदस्यांनी सहभाग आहे.
कार्यकर्ते सक्रीय
फाऊंडेशनचे शोएब शेख, सलीम पटेल, वसीम पटेल, मुश्ताक शाह, संत नरहरी सोना बहुउद्देशीय संस्थेचे सतीश, राहुल, पंकज, संजय सोनवणे, पवन सोनवणे, सोनु कोळी, आकाश पोतदार, योगेश कोळी, रितेश महाजन, अमाले पाटील, संजय सोनार, नाना मगरे, पीक संरक्षण संस्थेचे चेअरमन विठ्ठल सोनवणे, अनिल पाटील, भागवत धांडे आदी उपस्थित होते.