मुंबई: अनेक शाळांमध्ये मराठी भाषा शिकविली जात नाही असे प्रश्न विरोधकांनी अधिवेश प्रसंगी विधान परिषदेत मांडली. यावर उत्तर देतांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मराठी भाषा सर्व शाळांना तसेच बोर्डांना सक्तीची करण्यात येईल त्यासाठी आवश्यक बदल कायद्यात केले जाईल असे उत्तर दिले. अनेक इंग्रजी माध्यमांच्या शाळेत मराठी भाषा शिकविली जात नाही. सीबीएसई, आयसीएसई माध्यमांच्या शाळेत मराठी भाषेबाबत उदासीनता दिसून येत असल्याचे प्रश्न मांडण्यात आले.