पुणे । भाषा भाषांमध्ये फरक करू नये. मराठी भाषा सर्वांना समान वागवणारी भाषा आहे. मराठी भाषेचा विकास केला पाहिजे, वाढ केली पाहिजे. एमसीई सोसायटीच्या स्पोकन इंग्लिश अकॅदमीच्या या कार्यक्रमाने मराठी भाषेला चांगला प्रतिसाद दिला आहे, असे इतिहास संशोधक डॉ. सदानंद मोरे यांनी सांगितले. निमित्त होते; महाराष्ट्र कॉस्मॉपॉलिटन एज्युकेशन सोसायटीच्या ‘स्पोकन इंग्लिश अॅकॅडमी’तर्फे मराठी भाषा संवर्धन पंधरवडा समारोप कार्यक्रमाचे. यावेळी अल्लाना इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट सायन्सेसचे संचालक प्रा. डॉ आर गणेशन, मराठी अकादमीच्या संचालक नूरजहाँ शेख उपस्थित होते.
डॉ. सदानंद मोरे यांच्या हस्ते मराठी भाषा पंधरवडातील आयोजित विविध स्पर्धामधील विजेत्यांना पारितोषिक वितरण करण्यात आले. समारोपप्रसंगी बोलताना डॉ. मोरे म्हणाले, मराठी भाषेच्या अभिवृद्धीमध्ये मुस्लिम बांधवानी फार मोठे योगदान दिले आहे. सर्व भाषांना समानतेची वागणूक दिली पाहिजे आझम कॅम्पस आणि शहरभर हे कार्यक्रम झाले. मराठी भाषा संवर्धन पंधरवड्यातील उपक्रमांमध्ये ‘काव्य वाचन स्पर्धा’, ‘वक्तृत्व स्पर्धा’, ‘नाटक स्पर्धा’, ‘मराठी चित्रपट’शो, ‘महाराष्ट्रीयन खाद्य मेळावा, ‘मराठी लेखक आणि कवी भित्तीपत्रक स्पर्धा’, ‘प्रश्नमंजुषा स्पर्धा’, ‘महाराष्ट्रीयन वेशभूषा स्पर्धा’, कथाकथन, सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.