मराठी भाषेचे संवर्धन करायचे असेल तर इतर भाषाही शिकल्या पाहिजेत

0
लोणावळा एज्युकेशन ट्रस्टच्या डॉ.बी.एन.पुरंदरे कला, गुप्ता वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयाने केले आयोजन
भाषा पंधरवड्याचे उद्घाटनप्रसंगी कवी उद्घव कानडे यांचे मार्गदर्शन
लोणावळा : मराठी भाषेचे संवर्धन करायचे असेल तर इतर भाषाही शिकल्या पाहिजेत. जेवढ्या अधिक भाषा आत्मसात करू तेवढे आपण श्रीमंत होणार आहोत. या भाषा शिकल्याने इतर भाषेतील ज्ञान मराठीत आणता येते व आपल्या भाषेतील ज्ञान दूरपर्यंत पोहचवता येते. म्हणून इतर भाषांचा द्वेष न करता त्या जवळ केल्यानेच भाषेचे संवर्धन होणार आहे, असा संदेश कवी व निवेदक उद्धव कानडे यांनी विद्यार्थ्यांना दिला. लोणावळा एज्युकेशन ट्रस्टच्या डॉ.बी.एन.पुरंदरे कला, श्रीमती एस.जी.गुप्ता वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयात मराठी विभागाच्यावतीने दि.1 ते 15 जानेवारी 2019 दरम्यान ‘मराठी भाषा संवर्धन पंधरवड्या’ निमित्त विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले. या उपक्रमाची सुरूवात विद्यार्थ्यांनी ग्रंथालयाची स्वच्छता करून केली. या पंधरवड्याचे उद्घाटनप्रसंगी ÷उद्धव कानडे बोलत होते.
ग्रंथदिंडीने झाली सांगता
या पंधरवड्याची सांगता वाचन संस्कृतीचे जतन व्हावे म्हणून ग्रंथदिंडीने करण्यात आली. या प्रसंगी लोणावळा नगरपरीषदेच्या नगराध्यक्षा सुरेखा जाधव यांनी राजमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद यांच्या जयंती निमित्त त्यांच्या प्रतिमांना पुष्पहार अर्पण केला. ग्रंथपालखीचे पूजन करुन ग्रंथ दिंडीची सुरूवात केली व शुभेच्छा संदेश दिला. ही ग्रंथदिंडी महाविद्यालया पासून वलवण गावातील महादेवाच्या मंदिरापर्यंत नेण्यात आली. ग्रंथदिंडीत विद्यार्थ्यांनी साहित्य व भाषेसंबधीचे फलक हातात घेऊन टाळ मृदुगांच्या गजरात गाणी म्हणत भाषा संवर्धनाचा संदेश दिला.
यांची होती उपस्थिती
ग्रंथदिंडीच्या सांगता प्रसंगी नारायण पाळेकर, सुनील तावरे, हर्षल होगले, नागेश तारे, मुकुंद आंबेकर, गणेश घारे, बंडू येवले, मारुती कारके, उल्हास पाळेकर,नरेश बोरकर, सुनिल नांदवटे, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.बी. एन. पवार, उपप्राचार्य डॉ.जे.ओ.बच्छाव, कनिष्ठ विभाग प्रमुख सविता पाटोळे, कनिष्ठ व वरिष्ठ महाविद्यालयाचे प्राध्यापक, प्राध्यापकेतर कर्मचारी व विद्यार्थीवर्ग मोठ्या संखेने उपस्थित होते. ग्रंथदिंडीचे संयोजन मराठी विभाग प्रमुख डॉ.रवींद्र कडू, डॉ.राजेंद्र देवरे यांनी डॉ.पवन शिनगारे, प्रा.धनराज पाटील, प्रा.दीपक तारे, चांगुणा ठाकर व सांस्कृतिक विभागाच्या विद्यार्थ्यांच्या मदतीने केले.