हडपसर : मराठी भाषा ही आपली मातृभाषा आहे. परंतू आता मराठी भाषेकडे आपण दुर्लक्ष करत आहोत, त्यामुळे मराठी भाषा संवर्धनासाठी आपण मराठी भाषेत जास्तीत जास्त बोलावे व मराठी भाषेवर प्रभूत्व मिळवावे असे प्रतिपादन साधना विद्यालयाचे प्राचार्य संजय मोहिते यांनी केले.
मराठी राजभाषा दिनानिमित्त साधना विद्यालयात आयोजित मराठी राजभाषा दिन कार्यक्रमात ते बोलत होते. याप्रसंगी विद्यालयाचे प्राचार्य एस. जे मोहिते, उपमुख्याध्यापक एस. बी.कुलकर्णी , पर्यवेक्षक एम. वाय. कांबळे, आय. एस. जगताप, डी .डी.सुर्यवंशी , सांस्कृतिक विभागप्रमुख एस. पी .टिळेकर व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ए. के. वळवी यांनी केले तर आभार ए. एस. वाव्हळ यांनी मानले.
विद्यार्थ्यांनीचे विविध गुणदर्शन
यावेळी शाळेचे विद्यार्थी विद्यार्थी गणेश आगाव,अथर्व मेमाणे,कृष्णा पवार,आर्यन चक्के,ओंकार शिंदे यांनी मनोगत व्यक्त केले. तर अनिकेत हुंबे, रोहित लवंगारे, तन्मय भोसले, शिवम कायंदे यांनी मराठी नाटिका सादर केले. तर शिक्षक मनोगतात एस.एस. माने यांनी कविता सादर केली. तर पी.के.गायकवाड यांनी मराठीचे महत्त्व व कुसुमाग्रजांच्या साहित्याची माहिती दिली.