मुंबई : ‘लकी’ चित्रपटाचे फस्ट लूक पोस्टर रिलीज झाले आहे. पोस्टरमध्ये अभय महाजन निर्वस्त्रपणे कमरेला ट्यूब टायर लावून रस्त्यावरून धावताना दिसतोय. मराठी सिनेमाच्या इतिहासात हिरोचा असा पहिल्यांदाच परिचय होताना दिसत आहे.
एम एस धोनी आणि फ्लाइंग जाट सारख्या सुपरहिट सिनेमाची निर्मिती करणारे बी लाइव्ह प्रोडक्शन्सचे सुरज सिंग ‘लकी’ सिनेमाव्दारे मराठी सिनेसृष्टीत निर्माते म्हणून पाऊल ठेवत आहे. फिल्ममेकर संजय जाधव म्हणतात, “लकी ही आजच्या तरूणाईची कथा आहे. आजचे तरूण बिनधास्त आणि स्वच्छंद आहेत. त्यांची एकमेकांशी बोलण्याची भाषा खूप मोकळी-ढाकळी आहे. ते परंपरांगत काहीच करत नाहीत. त्यामूळे लकीमध्येही तुम्हांला अशी अपारंपारिक सरप्राइजेस मिळतील.”