मुंबई : बॉलीवूडची हॉटेस्ट डीवा मलायका अरोराने अर्जूनच्या रिलेशनशिपविषयीच्या चर्चांना खरे ठरवले आहे. अनेकदा या दोघांना एकत्र स्पॉट केले गेले आहे. ‘कॉफी विथ करण’ या चॅट शो मध्ये अर्जूनने देखील आपण सिंगल नसून लवकरच विवाहबंधनात अडकणार असल्याचेही कबुली दिली.
नुकतेच मलायकाने आपला इंस्ताग्राम अकाउंटवर फोटो शेअर केला आहे. या फोटोत तिच्या गळ्यात ‘ए आणि एम’ या अक्षरांचे पेंडंट दिसत आहे. हा ‘ए’ अर्जूनच्या नावाचे पहिले अक्षर असल्याचे बोलले जात आहे. त्यामुळे, मलायकाच्या गळ्यातील या पेंडंटकडे सर्वांचेच लक्ष वेधले आहे.