मला परवानगी दिल्यास पेट्रोल ३५ ते ४० रुपये लिटर मिळेल-रामदेव बाबा

0

नवी दिल्ली- सध्या देशभरात सामान्य नागरिक इंधनाच्या वाढत्या किंमतीमुळे त्रस्त आहे. दरम्यान योग्य गुरु रामदेव बाबा यांनी वेगळेच विधान केले आहे. केंद्र सरकारने मला परवानगी दिली तर मी पेट्रोल-डिझलेची 35 ते 40 रुपये प्रति लिटर दराने विक्री करु शकतो असे विधान योग गुरू बाबा रामदेव यांनी केले आहे. सरकारने मला परवानगी दिली आणि जर मला करामध्ये थोड्याफार प्रमाणात सवलत मिळाली तर मी पेट्रोल-डिझेल 35-40 रुपये प्रति लिटर दराने विकू शकतो, असं रामदेव म्हणाले आहेत.

मोदी सरकारने महागाई कमी करायला हवी असे ते म्हणाले. जर महागाई कमी केली नाही तर सरकारला चांगलाच फटका बसेल. 2019 आधी इंधनाचे दर कमी करा असा सल्ला मी यापूर्वीच मोदी सरकारला दिला आहे. रामदेव पुढे म्हणाले की, जर सरकारने मला पेट्रोल पंप चालवण्याची परवानगी दिली आणि करामध्ये थोडीफार सवलत दिली तर मी संपूर्ण देशात 35 ते 40 रुपये प्रति लिटर दराने विक्री करु शकतो. सरकारने इंधनाला जीएसटीच्या कक्षेमध्ये आणावं असंही ते म्हणाले.

दोन दिवसांपूर्वीही रामदेव यांनी महागाईवरून मोदी सरकारवर निशाणा साधला होता. रुपयाची अब्रू चव्हाट्यावर आली आहे. रुपयाने ऐतिहासिक नीचांक गाठला आहे. रुपयाची ही अवस्था बघून आता लाजेलाही लाज वाटत असेल, अशा शब्दात त्यांनी टीका केली होती.