मला पूर्ण विश्वास, राजस्थानमध्ये पुन्हा भाजप येणार सत्तेत-वसुंधरा राजे

0

जयपूर-राजस्थान विधानसभेसाठी ७ डिसेंबरला मतदान झाले. राजस्थानमध्ये भाजप सत्तेत आहे, दरम्यान यावेळी सत्तांतर होईल असे सांगितले जात आहे. दरम्यान मुख्यमंत्री वसुंधरा राजे यांनी यांनी विश्वास व्यक्त केला असून राजस्थानमध्ये पुन्हा भाजप सत्तेत येईल असा दावा त्यांनी केला आहे.

विविध वृत्तवाहिन्या व माध्यमांनी एक्झिट पोलद्वारे अंदाज वर्तविला असून राजस्थानमध्ये सत्तांतर होणार असे चित्र दिसत आहे. कॉंग्रेस बहुमत मिळवेल असे सांगण्यात येत आहे. ११ रोजी मतमोजणी होणार आहे.