मुंबई : तनुश्री दत्ताने नाना प्रकरण नंतर बॉलिवूडमध्ये #Me Too मोहिमेला उधाण आलं. काही दिवसांपूर्वीच तनुश्रीला बिग बॉसची ऑफर आली असून केवळ प्रसिद्धीसाठी तिने हे सगळं केला असल्याचा आरोप अनेकांनी तिच्यावर लावला. मात्र, आता तनुश्रीनं हे सर्व आरोप खोटे ठरवले आहेत.
एका मुलाखतीदरम्यान बॉलिवूडमध्ये पुनरागमन करण्याची आपली इच्छाच नसल्याचे स्पष्ट केले. आपल्याला बिग बॉस १२ ची ऑफर आली असल्याचे तनुश्रीनं मान्य केलं. मात्र, आता आपल्याला बिग बॉसच काय तर बॉलिवूडमध्येही पुन्हा जायचं नसल्याचं तिने सांगितलं. आता या क्षेत्रात मला अजिबातही परतायचं नसल्याचे सांगत तनुश्रीने हे सर्व आरोप फेटाळून लावले आहेत.