नवी दिल्ली – सोनिया गांधी यांचे जावई कॉंग्रेस नेत्या प्रियांका गांधी यांचे पती रॉबर्ट वड्रा यांनी केंद्र सरकारवर गंभीर आरोप केले आहे. ईडीकडून करण्यात आलेल्या छापेमारीबाबत त्यांनी केंद्र सरकारवर आरोप केले आहे.
‘गेल्या पाच वर्षांपासून मला त्रास दिला जात आहे. ईडीच्या अधिकाऱ्यांनी माझे मंदिरदेखील उद्धवस्त केले. या सर्व कारणांमुळे माझ्या कुटुंबाला आणि मुलांनाही त्रास सहन करावा लागत आहे’, असे वड्रा यांनी म्हटले आहे. केंद्राकडून हा नाहक त्रास देणे सुरु असून यामुळे माझ्या घरात तणावाचे वातावरण आहे. माझी आई अस्वस्थ आहे असेही वड्रा यांनी सांगितले आहे.