मल्हारसेनेतर्फे भुसावळ तालुक्यात होमीओपॅथी गोळ्यांचे वाटप

0

भुसावळ– पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांच्या २९५ व्या जयंतीनिमीत्त मल्हार सेनेतर्फे भुसावळ तालुक्यात आरोग्यवर्धक होमीओपॅथी गोळ्यांच्या
१००० बाटल्यांचे वाटप करण्यात आले.

महाराष्ट्र धनगर समाज प्रणित मल्हार सेनेतर्फे आज पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांच्या २९५ व्या जयंतीनिमीत्त कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सामाजिक उपक्रम राबविण्यात आला. दरवर्षी राजमाता पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांची जयंती मोठ्या उत्साहात आणि जल्लोषात साजरी केली जाते. मात्र यंदा देशभरात कोरोनाचा प्रादुर्भाव असल्याने सण उत्सवांवर बंधने आली आहे. असे असले तरी सामाजिक उपक्रमांच्या माध्यमातुन पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांना आज अभिवादन करण्यात आले. भुसावळ तालुक्यात मल्हार सेनेतर्फे आर्सेनिक अल्बम ३० च्या १००० बाटल्यांचे वाटप करण्यात आले. यात साकेगाव, वांजोळा, सुनसगाव, कुर्‍हा व इतर गावात या औषधींचे वाटप करण्यात आले.

यांनी घेतले परिश्रम
यावेळी मल्हार सेनेचे भुसावळ शहराध्यक्ष विशाल ठोके, भूषण ठोके, दिनेश झटकार, स्वप्नील सावळे, रघुनाथ सोनवणे, नामदेव सावळे, विश्वनाथ धनके
यांनी परिश्रम घेतले.