मल्हार कम्युनिकेशनतर्फे माझा गणपती माझा परिसर उपक्रम

0

जळगाव प्रतिनिधी शहरातील मल्हार कम्युनिकेशनतर्फे माझा गणपती, माझा परिसर हा अभिनव उपक्रम राबवला जात आहे.

या उपक्रमामध्ये आपल्या परिसरात लहान मात्र लोकोपयोगी ठरतील, अशी कामे शहरातील गणपती मंडळे व नागरिकांतर्फे त्यांच्या परिसरात करण्यात येणार आहेत. या उपक्रमाची व्याप्ती वाढावी व त्यात जास्तीत जास्त जळगावकर नागरिक सहभागी व्हावेत म्हणून आपल्या परिसराला सुविधा संपन्न करण्यासाठी कुठल्या गोष्टीची नितांत आवश्यकता आहे? कुठली सुविधा कमी पैशांमध्ये व कमी कालावधीत उभारली जाऊन तिचा लोकांना जास्तीत जास्त फायदा होऊ शकतो? अशा सुविधा सूचवण्याचे आवाहन आयोजकांतर्फे जळगावकरांना करण्यात आलेले आहे. तसेच या उपक्रमात विविध विधायक कामे सूचवण्याचे आवाहन मल्हार कम्युनिकेशनतर्फे जळगावकरांना करण्यात आलेले आहे.