फैजपूर। येथून जवळच असलेल्या मस्कावद येथील तरुणाचे बुलढाणा जिल्ह्यातील चिखली मेहकर येथील तरुणीशी विवाह सोहळा संपन्न झाल्यानंतर चारच दिवसात तरुणीने दागिणे घेऊन पळ काढला. मात्र मुलाच्या आई-वडीलांसह नातेवाईकांनी अतिशय सावध भुमिका घेऊन पोलिसांद्वारे सापळा रचून त्यांना कोथळी येथील मुक्ताबाई मंदिरात पडकून
त्यांना सावदा पोलीसांच्या ताब्यात देण्यात आले.
वधू मामाकडे जाण्याचा तगादा लाऊन झाली फरार
चिंतीत वराचा वडील मुलाच्या लग्नासाठी हलबल झाल्याचे पाहून सुपडाबाई कोळी व वसंत कोळी (रा. तांदलवाडी) यांनी मध्यस्थी करुन चिखली मेहकर, जिल्हा बुलढाणा येथील सोपान पाटील (नाव व पत्ता चुकीचा) यांच्या बहिणीचा विवाह 6 जून रोजी मारतीक बुवा मंदिरावर लावून चार दिवसात मुलीचे सोन्याचे दागिणे घेऊन पलायन करुन वर पक्षाला दीड लाखाचा चुना लावला. मस्कावद येथील प्रभाकर कौतीक सरोदे यांचा मुलगा योगेश प्रभाकर सरोदे (वय 28) यांचा विवाह सुपडाबाई कोळी रा. तांदलवाडी व वसंत कोळी रा. मस्कावद यांनी मध्यस्ती करुन जोडून दिला. नंतर विवाहित मुलीने आपल्या मामाला मलकापूरला भेटण्याचा तग लावला त्यानुसार योगेश सरोदे व त्यांची पत्नी मलकापूर येथे गेले व योगिता हिने योगेशला मोबाईलमध्ये बॅलेन्स टाकून येते असे सांगून पळ काढला.