जळगाव। जिल्हाधिकारी कार्यालयाच्या नियोजन भवनात महसुल विभागातर्फे होत असलेल्या 7/12 उतारा संगणीकृत करण्याचे काम हाती घेतले असून जिल्हाभरात असलेल्या तलाठी, मंडळाधिकारी व नायब तहसिलदार यांना तज्ञांकडून प्रशिक्षण कार्यशाळा घेण्यात आले. सदरी प्रशिक्षण दोन टप्प्यात करण्यात आले आहे.
मंगळवारी 30 मे रोजी प्रशिक्षणाचा पहिला दिवस होता. या प्रशिक्षणात साधारण 250 जणांनी सहभाग नोंदवला होता. शासनाच्या निर्णयानुसार 7/12 उतार फक्त कागदोपत्री न राहता त्याचे रूपांतर डिजीटल स्वरूपात करण्यात यावे. यासाठी विविध उपक्रमांचे आयोजन करत महसुल विभागातील कर्मचार्यांना याबाबत प्रशिक्षण दिले जात आहे. जिल्हा प्रशासनाकडून या आगोदरही याच पद्धतीने प्रशिक्षण दिले गेले. आता सुरू असलेल्या प्रशिक्षणात अधिक पद्धतीने व चांगल्या स्वरूपात होण्याकरीत अधिक भर दिला आहे. मंगळवारी 30 रोजी झालेल्या प्रशिक्षणात पाचोरा, एरंडोल, जळगाव आणि चाळीसगाव या उपविभागात येणार्या सर्व तलाठी, मंडळाधिकारी व नायब तहसिलदार यांची उपस्थिती होती. यांना प्रशिक्षक सचिन जगताप, जे.डी.बंगाळे, विठोबा पाटील, मिलिंद बुवा यांना प्रशिक्षण दिले.