जळगाव- महसूलमंत्री तथा जळगावचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी आज जिल्ह्यातील दुष्काळी परिस्थितीची पाहणी केली. दुष्काळाची पाहणी करण्यासाठी चाळीसगावला गेले होते. त्यावेळी त्यांनी कपाशी पिकाच्या परिस्थितीसह खर्च आणि हाती आले उत्पन्न यातील तफावत जाणून घेतली.
यावेळी महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी राज्यातील १५१ तालुके आणि २५० मंडळात दुष्काळ जाहीर केले असून दुष्काळी परिस्थितीची पाहणी करण्यासाठी कमिटी देखील नेमण्यात आली असल्याचे सांगितले.