प्रांताधिकारी अजीत थोरबोले यांची माहिती
रावेर:- महसूल वसुलीबाबत हलगर्जी करणार्या तलाठ्यांचे वेतनवाढ रोखण्यात येणार असल्याची माहिती प्रांताधिकारी अभिजीत थोरबोल यांनीे दिली. मार्च महिना महसूल वसूलीचा असून रावेर तालुक्यातील काही तलाठ्यांनी शंभर टक्के वसुली केली मात्र अनेक तलाठी असे आहेत की त्यांच्या वसुलीत अपेक्षित प्रतिसाद मिळालेला नाही त्यामुळे अशा तलाठ्यांचे वेतन रोखण्यात येणार आहे. यापूर्वी तहसीदार विजयकुमार ढगे यांनी सुध्दा वारंवार बैठका घेऊन वसुलीचा आढावा घेतला असून त्याबाबत तेही लक्ष ठेवून असल्याचे ते म्हणाले.