महाआघाडीला सपाचा धक्का; तिसऱ्या आघाडीला पाठिंबा !

0

लखनऊ : भाजपला पर्याय देण्यासाठी देशभरातील विरोधी पक्षांची महाआघाडी स्थापन करण्याच्या काँग्रेसच्या प्रयत्नांना अखिलेश यादव यांच्या नेतृत्वाखालील समाजवादी पक्षाने जोरदार धक्का दिला असून तेलंगणचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांनी भाजप व कॉंग्रेसला पर्याय म्हणून प्रस्तावित केलेल्या तिसऱ्या आघाडीला अखिलेश यादव यांनी पाठिंबा दिला आहे. आगामी लोकसभा निवडणुकांच्या पाश्र्वभूमीवर काँग्रेसला हा मोठा धक्का असल्याचे मानले जात आहे.

प्रादेशिक पक्षांची तिसरी आघाडी स्थापन केल्याबद्दल अखिलेश यादव के. चंद्रशेखर राव यांची भेट घेणार आहे. मध्य प्रदेशात सपचा एकमेव आमदार निवडून आला आहे. मात्र या आमदाराला मंत्री न बनवल्याने अखिलेश यादव काँग्रेसवर नाराज आहेत. यामुळेच त्यांनी उत्तर प्रदेशात ताकद नसलेल्या काँग्रेसला बळ न देण्याचा निर्णय घेतल्याचे सांगण्यात येते.