भडगाव । जलसंपदा मंत्री ना. गिरीष महाजन यांच्या संकल्पनेने भडगाव व पाचोरा तालुका मिळून विनामूल्य भव्य ग्रामीण आरोग्य शिबीराचे रविवार 12 नोव्हेंबर रोजी पाचोरा येथे अटल मैदान भडगाव रोड वर आयोजन करण्यात आले आहे. त्यासाठी पूर्व तपासणी शिबिराचे भडगाव ग्रामीण रुग्णालय, कजगाव, गुढे, पिंपरखेड, गिरड या प्राथमिक आरोग्य केंद्रावर नोंदणी व पुर्व तपासणी मार्गदर्शन शिबिर भरवण्यात आले आहे. त्यासाठी नागरिकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. 5 ते 11 नोव्हेंबर पर्यंत नोंदणी करून 12 नोव्हेंबर रोजी पाचोरा शिबिरात रोग निदान करण्यात येणार आहेत. त्यासाठी विविध ठिकाणी पूर्व तपासणी शिबीर भरवण्यात आले आहे.
पूर्व तपासणी शिबिराला रूग्णांची गर्दी
गुरूवार 9 रोजी शिबीराच्या पूर्व तपासणी शिबिराला भाजपा युवा मोर्चाचे जिल्हाध्यक्ष अमोल पाटील, वैद्यकीय आघाडीचे जिल्हाध्यक्ष डॉ. संजीव पाटील, भाजपा तालुकाध्यक्ष सोमनाथ पाटील, विहापचे नाना हाडपे, बजरंग दलाचे मिलिंद बोरसे, शहराध्यक्ष शैलेश पाटील, भाजयुमो शहराध्यक्ष निलेश महाजन, अनुलोमचे विकास लोहार, डॉ. शेखर पाटील यांनी भेट दिली. यावेळी भूषण पवार, प्रदीप कोळी, समाधान कोळी, शेखर पाटील, गोकुळ महाजन, मनोहर चौधरी, अनिल बडगुजर , शुभम सुराणा आदी स्वयंसेवक हजर होते. तपासणीसाठी 7 ते 8 डॉक्टरांची टीम बनविण्यात आली आहे. त्यांच्या मार्फत रुग्णांची तपासणी व नोंदणी करण्यात येत आहे. सकाळी पिंपरखेड आरोग्यकेंद्रास भाजपा वैद्यकीय आघाडीचे जिल्हाध्यक्ष डॉ संजीव पाटील, तालुका अध्यक्ष सोमनाथ पाटील, आदींनी भेट देऊन मार्गदर्शन केले, यावेळी डॉ. जीनेंद्र पाटील व डॉ. देशमुख यांच्यासह दोन डॉक्टरांची टीमने रुग्णाची तपासणी केली.
सर्व आजारांचे मोफत औषधोपचार
5 ते 11 नोव्हेंबर पर्यंत तालुक्यातील आरोग्य केंद्रावर तपासणी मोहीम सुरू ठेवण्यात आली आहे. भडगाव येथे 1716, पिंपरखेड 1248, गुढे-954, गिरड 698 व कजगाव येथे 558 नागरिकांनी दि 12 च्या शिबिरासाठी एकुण 5174 नोंदणी केली आहे. तालुक्यातील जनतेला सर्व आजारांचे मोफत तपासणी, औषधोपचार व ऑपरेशन करण्यासाठी ही महत्त्वाची संधी असून नागरिकांनी या शिबिराचा लाभ घावा, असे आवाहन भाजयुमो जिल्हाध्यक्ष अमोल पाटील, वैद्यकीय आघाडीचे जिल्हाध्यक्ष डॉ.संजीव पाटील, भाजपा तालुकाध्यक्ष सोमनाथ पाटील, शहराध्यक्ष शैलेश पाटील यांनी केले आहे .