लोणावळा:महागांव ग्रुप ग्रामपंचायतच्या उपसरपंचपदी प्रदीप सुनील साबळे यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे. मावळते उपसरपंच रामदास घारे यांचा कार्यकाळ संपल्याने त्यांनी राजीनामा दिला होता. रिक्त झालेल्या जागेसाठी ही निवडणूक पार पडली. सरपंच सुजाता पडवळ यांच्या अध्यक्षतेखाली रिक्त झालेल्या जागेसाठी निवडणूक घेण्यात आली होती. यावेळी प्रदीप साबळे व शोभा सांवत यांचे दोन अर्ज दाखल झाले होते. मात्र छाननी करताना सावंत याचा अर्ज बाद झाल्याने साबळे यांची बिनविरोध निवडीची घोषणा साहाय्यक निवडणूक अधिकारी एस.एम.दुधाळ यांनी केली.
हे देखील वाचा
यावेळी सरपंच सुजाता पडवळ, सुरेखा जाधव, रामदास घारे, पांडुरंग मरगळे, अंजना गोरे, शोभा सांवत हे सदस्य तसेच लोणावळा ग्रामीण पोलीस ठाण्याचे नाईक एस.शेख व सुधीर घारे उपस्थित होते. प्रदीप साबळे यांच्या निवडीनंतर गणेश धानिवले, बाळासाहेब जाधव, अंकुश पडवळ, विलास साबळे, संदीप साबळे, मंगेश कालेकर, एकनाथ पडवळ, अनिल साबळे, गणेश साबळे, काशिनाथ डोंगरे, बाळु बैकर, रोहिदास साबळे, दत्ता साबळे आदी ग्रामस्थांनी गुलालची उधळण करुन पेढे वाटुन आनंदोत्सव साजरा केला.