महागाईविरोधात राष्ट्रवादी मुक्ताईनगर तहसीलदारांना निवेदन

0

मुक्ताईनगर- गेल्या चार वर्षांपासून राज्यातील भाजप सरकार चुकीच्या धोरणामुळे महागाई मोठ्या प्रमाणात वाढली असून सर्वसामान्यांचे त्यामुळे कंबरडे मोडले आहे. त्याचा निषेध म्हणून तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीतर्फे तहसीलदारांना निवेदन देण्यात आले. इंधन दर वाढीमुळे पेट्रोल व डिझेल, गॅसच्या किंमतीत वाढ झाल्याचे प्रशासनाला दिलेल्या निवेदनात नमूद करण्यात आले आहे. तालुक्यातील बहुतेक रस्ते खराब झाले असून यामुळे अपघाताचे प्रमाण वाढले आहे. सरकारने ध्येय धोरणे अंमलात आणली नाहीत तर राष्ट्रवादी काँग्रेसने आंदोलन छेडण्याचा इशारा दिला आहे निवेदन देतेवेळी तालुकाध्यक्ष यु.डी.पाटील, विनोद तराळ, सुधाकर पाटील, सोपान दुत्ते, शाहिद खान, ईश्वर राहणे, किशोर चौधरी, अशोक नाईक, आनंदराव देशमुख आदी उपस्थित होते.