महाजनांकडून सरसंघचालकांच्या वक्तव्याचे समर्थन

0

नागपूर : लोकसभा अध्यक्षा सुमित्रा महाजन यांनी नागपुरात सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांच्या वक्तव्याचे समर्थन केले आहे. सीमेवर गरज पडल्यास तीन दिवसात संघ स्वयंसेवकांना तयार करू शकतो, या भागवतांच्या वक्तव्याचे समर्थन करताना महाजन म्हणाल्या, या वक्तव्यामागील भाव समजून घ्यायला हवा. प्रसारमाध्यमांनी हे लक्षात घ्यायला हवे. काही लोक आणि संघटनांचे स्वातंत्र्य आंदोलनात काय योगदान आहे, असाही प्रश्‍न विनाकारण उपस्थित केले जातात, याकडेही त्यांनी लक्ष वेधले. नागपुरात स्वातंत्र्यवीर सावरकर साहित्य संमेलनाच्या उद्घाटन कार्यक्रमात त्या बोलत होत्या.