भुसावळ। महात्मा फुले यांनी शिक्षणाविषयी जागृती निर्माण समाजातील अनिष्ट रुढी, परंपरांना फाटा दिला त्यामुळे ते खरे समाजसुधारक असल्याचे प्रतिपादन माळी शिक्षण मंडळाचे अध्यक्ष कैलास महाजन यांनी केले. माळी भवनात महात्मा फुले यांची जयंती साजरी करण्यात आली. अध्यक्षस्थानी कैलास महाजन होते. त्यांनी आपल्या मनोगतात महात्मा फुले यांच्या शिक्षणाविषयी धोरणाची माहिती दिली. त्यामुळेच त्यांना डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी आपले गुरु मानल्याचे नमूद केले.
यांची होती उपस्थिती
याप्रसंगी कैलास बंड, सुधाकर महाजन, सुरेश महाजन, रामकृष्ण माळी, राजू माळी, योगेश महाजन, दशरथ महाजन, जयराम राऊत, बी.एन. महाजन, धनंजय महाजन, ईश्वर चौधरी, रमेश महाजन, दिलीप माळी, प्रशांत महाजन, संजय महाजन, दिलीप चौधरी आदी उपस्थित होते.
पुरस्कार सुरु करणार
याप्रसंगी मंडळाचे सचिव गजेंद्र महाजन यांनी आपण महात्मा फुले यांच्या जयंतीनिमित्त आदर्श शिक्षक पुरस्कार सुरु करण्याची व फुले दाम्पत्यास भारतरत्न पुरस्काराने सन्मानित करण्याची मागणी सरकारला करु, अशी सुचना मांडली. सर्व समाजबांधवांनी प्रतिमा पूजन करुन अभिवादन केले.