महात्मा बसवेश्‍वर यांची जयंती साजरी

0

जळगाव । महावितरणतर्फे बुधवार 18 रोजी महात्मा बसवेश्‍वर यांची जयंती साजरी करण्यात आली. याप्रसंगी मुख्य अभियंता ब्रिजपालसिंह जनवीर यांनी महात्मा बसवेश्‍वर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केले. उपमुख्य औद्योगिक संबंध अधिकारी अरूण शेलकर यांनी महात्मा बसवेश्‍वर यांच्या जीवनकार्याची ळख करुन दिली. ते म्हणाले, ‘महात्मा बसवेश्‍वर हे संत, समाजसुधारक होते. त्यांनी जातीव्यवस्थेविरुध्द व अनिष्ट प्रथांविरुध्द संघर्ष केला. त्यांनी निर्गुण, निराकार एकेश्‍वरवादी श्रद्धेचा पुरस्कार केला.

मंगळवेढ्यात उभारली लोकशाही संसद
बाराव्या शतकात अहिंसा, सत्य, भूतदया आणि सर्वधर्मसमानता असे क्रांतिकारक विचार त्यांनी मांडले. कायकवे कैलास म्हणजे कर्म करण्यातच स्वर्ग आहे. कोणतेही काम कमी प्रतीचे किंवा उच्च प्रतीचे नसते, सर्व मानव समान आहेत. कोणतीही जात श्रेष्ठ किंवा कनिष्ठ नाही असे महात्मा बसवेश्‍वर यांचे तत्त्वज्ञान आहे. महात्मा बसवेश्‍वरांनी मंगळवेढा येथे लोकशाही संसद म्हणजेच ’अनुभव मंटपाची’ स्थापना केली. या अनुभव मंटपात सर्व धर्मातील लोक एकत्र येऊन सामाजिक अडचणींवर कशी मात करावी यावर चर्चा होत असे.’ या कार्यक्रमास जनसंपर्क अधिकारी किशोर खोबरे, सहाय्यक अभियंता पवन खांडेकर, विरेंद्र पाटील, राजेश अहेर, नितीन पाटील आदी अधिकारी-कर्मचारी उपस्थित होते. यशस्वीतेसाठी दिपक कोळी व धनराज करोसिया यांनी परिश्रम घेतले.