महानगरपालिकाचे अंदाजपत्रक सादर ; पुणेकरांवर करवाढीचा बोजा

0

पुणे : महानगरपालिकाचे आयुक्त सौरभ राव यांनी यांनी आज दि. १७ गुरूवार रोजी सन २०१९-२० या अर्थिक वर्षाचे ६ हजार ८२ कोटी रुपयांचे अंदाजपत्रक स्थायी समिती समोर सादर केले. गेल्या वर्षीपेक्षा या अंदाजपत्रकामध्ये तब्बल ६८८ कोटींची वाढ करण्यात आली आहे. गतवर्षी तत्कालीन महापालिका आयुक्तांनी प्रशासनाच्या वतीने ५ हजार ३९७ कोटींचे अंदाजपत्रक सादर केले होते. महापालिका आयुक्तानी अंदाजपत्रक सादर करताना उत्पन्न वाढीवर भर दिला आहे. त्यामुळे यंदाच्या चालू आर्थिक वर्षी तब्बल ६ हजार ८२ कोटींचे अंदाजपत्रक सादर करण्यात आले. दरम्यान अंदाजपत्रकात मिळकतकरामध्ये १२ टक्के, तर पाणीपट्टीत १५ टक्के करवाढ करत पुणेकरांवर करवाढीचा बोजा लादण्यात आला आहे.

अंदाजपत्रकातील तरतुदी :

२४ बाय ७ समान पाणी पुरवठा योजनेला गती देणार, भामा आसखेड योजना ऑक्टोबर २०१९ अखेर पर्यंत पूर्ण करणार. पुनर्वसनासाठी अंदाजपत्रकात तरतुद, कात्रज तलावांचे प्रदुषण रोखणार, घनकचरा व्यवस्थापनसाठी ५४६ कोटींची तरतुदी,  जानेवारी २०२० नंतर शंभर टक्के कच-यावर प्रक्रिया करणार ,शिवणे – खराडी रस्त्यासाठी ३१.६० कोटींची तरतुद यासह आदी बाबींचा समावेश आहे.